भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद-बरोनी, बलसाड-कानपूर , हापा-बिलासपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे अहमदाबाद-बरोनी विशेष गाडी
09483 डाउन विशेष दिनांक 01.03.2021पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद येथून प्रतिदिन 00.25 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 18.40 वाजता बरोनी येथे पोहोचेल.
09484 अप विशेष दिनांक 03.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत फैजाबाद येथून प्रतिदिन 19.30 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी 12.40 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबा- भुसावळ
बलसाड कानपूर सुपरफास्ट साप्ताहिक
09243 डाऊन विशेष दिनांक 24.02.2021पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बलसाड येथून दर बुधवार 22.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.30 वाजता कानपूर येथे पोहोचेल.
09244 अप विशेष दिनांक 26.02.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कानपूर येथून दर शुक्रवार 8 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.40 वाजता बलसाड येथे पोहोचेल.
थांबा- जळगाव,भुसावळ,खंडवा
हापा बिलासपुर साप्ताहिक सुपरफास्ट
09239 डाऊन विशेष दिनांक 27.02.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हापा येथून दर शनिवार 21.55 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 03.00 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
09240 अप विशेष दिनांक 01.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बिलासपूर येथून दर सोमवार 10.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता हापा येथे पोहोचेल.
थांबा- बडनेरा,अकोला,भुसावळ,जळगाव
उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया
www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांनी बोर्डिंग,प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल


