अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू ;


भुसावळ प्रतिनिधी )-
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री दीपनगर सरगम गेटजवळ रात्री उशिरा घडली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाले असून तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निंभोरा येथील सरगम गेट जवळील चेतन हॉटेल जवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात दोन वाहनांनी महिलेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनच्या सहा.निरीक्षक रूपाली चव्हाण, श्यामकुमार मोरे, संदीप बडगे यांच्यासह निंभोरा येथील पोलीस पाटील विजय मुरलिधर धांडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे हलविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *