भुसावळ (प्रतिनिधी )-
वीज वितरण कंपनीने कुठलीही
नोटीस न देता तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने शेतकऱ्यांच्या उभे
पिकांचे नुकसान होत आहे. याकरीता भाजपातर्फे सरकारचा निषेध करण्यात येवून धिक्कार मोर्चा काढण्यात आला .
वीज बिल माफ करून त्वरित वीज कनेक्शन सुरू करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी
सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीत विश्रामगृह पासून
धिक्कार मोर्चाला सुरुवात करण्यात आली . वीज वितरण कंपनीच्या कार्यालया पर्यत पायी चालून सत्तेधारी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर
शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणार होते.असे सांगणाऱ्या सरकारने
शेतकऱ्यांचे रक्त शोषण करण्याचे काम सुरू करून वीज पुरवठा खंडित
करण्याचे काम सुरू केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित वीज
पुरवठा सुरू करावे यासाठी मोर्चात सहभागी झाले.यावेळी तीन तिघाडी
सरकारचे करायचे काय , खाली डोके वरती पाय,अशा घोषणा देण्यात
आल्या तसेच सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.यानंतर वीज वितरण
कंपनीचे अधिकारी प्रदीप रामदास घोरुडे यांच्यासोबत आमदार संजय
सावकारे यांनी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यासंदर्भात चर्चा केली व निवेदन दिले.
याप्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी,शहर अध्यक्ष परीक्षित ब-हाटे,
प्रवीण इखनकार, अनिल शर्मा,विशाल जंगले,गिरीश महाजन,सतीश
सपकाळे, पुंडलीक पाटील,राजेंद्र चौधरी,अँड.प्रकाश पाटील,शिरीर
जावळे, उपनगराध्यक्ष रमेश नागराणी,सौ.शैलजा पाटील,सुनील महाजन
अनिल महाजन,सुभाष कोळी,रविंद्र निमानी ,राजेंद्र नाटकर असे शेकडो
कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.



