महाआघाडी सरकारचा भुसावळ भाजपाच्यावतीने जाहिर निषेध ; आ .संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे देणार निवेदन;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शेतकऱ्यांचे वीजबिल १०० टक्के माफ करू अशी घोषणा करून देखील ती पूर्ण न करणाऱ्या तसेच शेतकऱ्याना जाणून बुजून त्रास देण्याऱ्या राज्यातील महाआघाडी सरकार विरुद्ध भुसावळ भाजपाच्यावतीने
जाहीर निषेध करण्यात येत असून
आ . संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी व तहसीलदार यांना उद्या दि.१५ सोमवार रोजी दुपारी ४ वाजता
शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.
निवेदनात नमूद आहे की
शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे.
आम्ही विजबिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीज बिल भरण्यासाठी सवलत देऊ असे सांगितले होते.
वरील कोणतीही बाब लक्षात न घेता निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावताय.
कोणतीही पूर्व सूचना न देता संपूर्ण डीपी बंद करून नाहक शेतकऱ्याला त्रास दिला जातोय.
अशाच प्रकारे कोणतीही पूर्व सूचना न देता घरगुती वीज कनेक्शन तोडून सर्व विजग्राहकाना त्रास दिला आहे., ही सर्व शेतकऱ्यांची फसवेगिरी आहे.त्यांना जाणून बुजून त्रास देण्याऱ्या राज्यातील महाआघाडी सरकार विरुद्ध शांतता मार्गाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन निवेदन द्यायचे आहे.
या सरकार मधील वीज मंत्र्याने शेतकऱ्यांचे वीजबिल 100 टक्के माफ करू अशी घोषणा केली होती पण ती पूर्ण केली नाही.म्हणून या शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच दिलेल्या निवेदनावर राज्यातील महाआघाडी सरकारने निर्णय न घेतल्यास,शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास, आगामी कालखंडात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल व त्या आंदोलनाला राज्यातील हे शेतकरी विरोधीसरकार जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे
याकरीता सर्व नगरसेवक,पदाधिकारी ,सक्रीय कार्यकर्ते,शक्तीकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख यांनी उपस्थीत रहावे.
असे आवाहन भुसावळ भाजपा शहराध्यक्ष परिक्षीत ब-हाटे , भालचंद्र पाटिल तालुका अध्यक्ष आणि सरचिटणीस पवन बुंदेल,अमोल महाजन दिलीप कोळी तालुका सरचिटणीस यांनी केले आहे.तसेच ज्या शेतकर्यांना वाढीव वीजबीले आलेली आहेत त्यांनी दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह,भुसावळ येथे यावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *