आठवड्याच्या ठराविक दिवशी प्रीमियम इंडेंट अंतर्गत रेल्वेकडून रॅकची उपलब्धता ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे मंत्रालयाने आपल्या मालवाहतूक ग्राहकांच्या सोयीसाठी प्रीमियम इंडेंट संबंधी धोरण अमलात आणले आहे. या धोरणांतर्गत, एखाद्या ग्राहकाने प्रीमियम इंडेंटसाठी विनंती केल्यास, सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवसात रॅकची उपलब्धता/वाटप करण्यास प्राधान्य दिले जाईल. तथापि, इतर दिवशी नियमित इंडेंट्सच्या  प्राधान्यक्रमाच्या ऑर्डरचे पालन केले जाईल.
या योजनेची ठळक वैशिष्ट्ये अशी:
१) ही योजना पर्यायी असेल.
२) रेल्वे सायडिंग मध्ये, मालवाहतूक ग्राहक रॅक्स पुरवण्याची तारीख  सूचित करू शकतात आणि मुदतीनंतर रेक पुरवठा केल्यास तो / ती सामान्य दराने लोड करणार की नाही हे देखील सूचित करु शकतात .
३) ग्राहकाने सामान्य भाडेदराच्या ५% प्रीमियम भरणे आवश्यक आहे जे आगाऊ जमा केले जाईल. जर रॅक इंडेंटवर सूचित तारखेनंतर पुरविला गेला असेल तर भरलेला प्रीमियम सामान्य भाडेदरात  समायोजित केला जाईल.
४) गुड्स  शेडमध्ये देखील ग्राहकाना प्रीमियम इंडेंट लावण्यास परवानगी दिली जाईल. रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या प्राधान्याने वाहतूक करण्याचे अधिसूचित केल्यानुसार त्यांना दोन दिवसांच्या वाटपाला प्राधान्य मिळेल. तथापि, इतर दिवसांमध्ये इंडेंट्सच्या प्राथमिकतेच्या सामान्य आदेशाचे पालन केले जाईल.
५) एकदा प्रीमियम इंडेंट लावल्यानंतर परत घेता येणार नाही. इंडेंट मागे घेतल्यास भरलेला प्रीमियम परत मिळणार नाही.
६) प्रीमियम इंडेंट पॉलिसी कोटाद्वारे नियंत्रित गंतव्यस्थाने आणि प्रतिबंधित गंतव्यस्थानांना लागू होणार नाही.
मध्य रेल्वेच्या मालवाहतूक ग्राहकांनी या नव्याने सादर झालेल्या प्रीमियम इंडेंट पॉलिसीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *