भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनची बैठक ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या जिल्हा सचिव जास्वंदी भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच
भुसावळ तालुका अध्यक्ष उज्वला बागुल यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात
7 फेब्रुवारी रोजी ग्राहक कल्याण फाउंडेशन कार्यालय ,तेली गल्ली, विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ येथे बैठक संपन्न झाली .
बैठकीस जिल्हासचिव सौ.जास्वंदी भंडारी व तालुकाध्यक्ष उज्वला बागुल यांनी महत्वपूर्ण मार्गदशन केले .
यावेळी तालुका उपाध्यक्ष हर्षल गोराडकर , सचिव डॉ.नितीन यावलकर ,
कोषाध्यक्ष एडव्होकेट निलेश भंडारी , विवेक सैनी , विकास धारबळे ,ॲड.विक्रम शेळके , श्रीमती सुनंदा खरे ,सौ. नेहा यावलकर, अलका भगत , विवेक पोतदार , अजय रायकवार, जयंत धांडे यांचेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते . प्रसंगी मिटिंग मध्ये सर्व पदाधिकारी अणि सदस्यांचे सदस्यता फॉर्म भरून घेणे. नविन सदस्यांचा परिचय करून घेणे. तसेच वेळेवर आलेल्या सूचनांचा स्वीकार करून त्यावर विचार विनिमय करण्यात येवून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले . सध्या गॅस सिलेंडरच्या वजनात तफावत जाणवत असल्याच्या प्राप्त तक्रारी आणि शिक्षण विभागाकडून कोविड काळात शिक्षण संस्था बंद असतांनाही पालकांकडून होणारी सक्तीची फी वसुली या दोन विषयावर चर्चा झाली व संबंधीत खात्याकडे या संदर्भातील निवेदन देण्याचे ठरले व बैठक संपन्न झाली.



