अनिल चौधरीं कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेत रुजू ;

भुसावळ –

जनार्दनाच्या आशीर्वादामुळेच मी आज
कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेत रुजू झाले असल्याचे मत मा. नगराध्यक्ष अनिल चौधरीं यांनी शुक्रवार रोजी व्यक्त केले .
त्यांनी भुसावळ येथे सकाळी साई मंदिरात दर्शन घेतले व रावेर येथे शुभम पुंडलिक पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या पुणे येथिल सुप्रसिद्ध न्यू सुर्या अमृततुल्य चहा सेंटरला भेट दिली.
आपल्या रावेर ग्रामीण भागातील युवकाने शेतीबरोबरच नवीन उद्योग धंदे सुरू केले हे पाहून मनस्वी आनंद झाल्याचे सांगत युवकांनी उद्योग व्यवसायाकडे सुद्धा वळावे असे मत व्यक्त केले व शुभमला पुढील व्यवसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या दरम्यान नगरसेवक सुरज चौधरी, सुधाकर नाईक, असिफ खान, सुर्यकांत शिंदे, विकास महाजन, पंकज चौधरी, अभिजित नाईक यांचेसह अन्य चाहत्यानी सुद्धा भेट देवून चौकशी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *