लोकसंघर्षतर्फे डोलारखेडा फाट्यावर रस्ता रोको ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-
संपूर्ण भारतात कोरोनारख्या महामारीने थैमान घातले असताना नागरीक भयभीत असून स्वतःचा जीव वाचवण्याच्या पलीकडे नागरीकांना दुसरे काही सूचत नसताना केंद्र सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवत शेतकरी व शेतमजुरांवर अन्याय करणारे बिल पास केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता लोकसंघर्ष मोर्चा व सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत डोलारखेडा फाट्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली. यावेळी पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त लावण्यात आला होता. विविध घोषणांनी परीसर दणाणला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाचे केशव वाघ यांनी केले तर शेतकरी दिलीप पारधी, सुभाष पावरा, गुंफाबाई बेलदार पारधी, विश्वास पवार, जेसीबाई पवार, सगुणाबाई पवार, सहदेव भटकर, चत्रु आडे, ग्यानसिंग बरेला, सीताराम बारेला, कैलास बारेला, दिलीप बारेला, सुरेश भील, खलिलशा फकीर, देवानंद पवार, भावसिंग झिपरु भोसलेंसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक निलेश साळुंखे, सहाय्यक फौजदार शेजोळे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप पाटील, रोहन पाटील, गोपनीय विभागाचे अविनाश पाटील, होमगार्ड सोनवणे, जगताप घुले, गवळी, पाटील आदींनी बंदोबस्त राखला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *