भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे कार्मिक विभागाच्यावतीने कोविड आजाराने मयत झालेल्या रेल्वे कर्मचार्याचे वारसदाराला एका दिवसांत पी एफ आणि इतर सर्व रक्कम प्रदान करण्यात आली तसेच पेंशन देखील त्याच दिवसापासून लागू करून कार्मिक शाखेची उल्लेखनीय कामगिरी केली आहे .
येथील कै . कैलास सीताराम ट्रॅक मन यांचे कोविड १९ मुळे दिनांक २८ रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे दिनांक २ सप्टेंबर ला प्राप्त झाली आणि त्याच दिवशी एका दिवसात त्यांच्या वारसदाराला कार्मिक विभागाच्यावतीने पी एफ आणि इतर सर्व रक्कम प्रदान करण्यात आली आणि तसेच पेंशन देखील त्याच दिवसापासून लागू करण्यात आले.
हे सर्व काम अतीशय तत्परतेने आणि कार्यकुशलता पूर्वक श्रीकांत सूर्यवंशी कल्याण निरीक्षक यांनी केले तसेच कार्मिक आणि लेखा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे ही सहकार्य मिळाले. एन डी गांगुर्डे सिनिअर डी पी ओ यांचे मार्गदर्शनाखाली कार्मिक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



