भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील राम मंदीर वार्ड लगत असलेल्या मीना काॅम्प्लेक्स मधील तिस-या मजल्यावरील भारतीय जिवन विमा निगम एलआयसीच्या इमारतीत आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने यात मोठी हानी टळली. एलआयसीच्या तिस-या मजल्यावरील बॅट-या-युपीएस ठेवलेल्या रूममधून धुर निघून दुर्गंध येत असल्याने पळापळ सुरू झाली मात्र काही कर्मचा-यांनी तात्काळ या रूमकडे धाव घेत आग विझवण्याच्या यंत्राने आगीवर मारा करून आग आटोक्यात आणली.
आगीवर तात्काळ नियंत्रण मिळाल्याने कुठलीही जिवीत किंवा वित्तीय हानी झाली नाही.अन्यथा या भल्या मोठ्या वाणिज्य वापराच्या इमारतीला एकच जीना असल्याने मोठी जिवीत व वित्तिय हानी झाली आहे.सुरक्षितता व पार्कींगसाठी आवश्यक ती जागा न सोडल्याने तत्कालीन सत्ताधारी व ईमारत मालकामध्ये ब-यापैकी वाद होऊन नोटीस देण्यात आल्या होत्या व काही दिवसानंतर सत्ता परिवर्तन झाल्याने प्रकरण थंड बस्त्यात पडले होते व या आगीमुळे ते पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.आग विझल्याच्या काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले होते.



