अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी – मंगेश पाटिल .


भुसावळ (प्रतिनिधी )-
अतिवृष्टीमुळे भुसावळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांची उभी पिके भुईसपाट झाली असून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली आहे. या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त भागाचे तातडीने महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केली असून याबाबत जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील व तहसीलदार भुसावळ यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यात गेल्या सहा सात दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका , तळवेल, पिंपळगाव खुर्द, दर्यापूर सुनसगाव वांजोळा जोगलखेडा पिंपळगाव बु, वेल्हाळा, सुसरी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद,मूग,तुर,कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे जोरदार पावसामुळे किन्ही, सुनसगाव वांजोळा जोगलखेडा खडका या ठिकाणी संततधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे, या पावसामुळे मूग,उडीद, भुईमूग, तूर,या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगाना झाडावरच कोम फुटले असून ते पूर्णपणे खराब झाले आहे,त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच करोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याही वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवाती पासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली. अशातच काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने बर्‍याच शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. यातून जी पिके वाचली त्यांना युरिया आदी खते साठेबाजीमुळे वेळेवर उपलब्ध झाली नाही. अशातच सलग सहा-सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या सर्व संकटातून वाचलेली उरली सुरली पिकेही डोळ्यादेखत सडू लागली आहेत.
कायम निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेला शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला असून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात पाऊस असल्याने उडीद,मूग, तुर,भुईमूग, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत,
सलग सहा सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भागाचे तातडीने महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व तहसीलदार भुसावळ यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *