भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. मुक्ताईनगर: जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरीता महत्वाच्या अशा हतनूर धरणाचे ३२ दरवाजे गुरुवार २ जुलै रोजी सकाळी सातला अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.
जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे ३२ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून ३२ दरवाजातून
३०५१६ क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी खळाळून वाहू लागली आहे. सद्य:स्थितीत धरणाची जलपातळी २०९.९१० मीटर आहे. धरणात आज रोजी १९२.४० दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. भुसावळ, मुक्ताईनगर,बोदवड,यावल,रावेर या तालुक्यातील शेतीला याचा लाभ होणार आहे.जर परिस्थिती अशीच राहिली तर हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडावे लागणार आहे.अशी माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन.महाजन यांनी दिली आहे. सायंकाळी ५ वाजेला हतनूर धरणाची पातळी कमी झाल्याने सहा दरवाजे बंद करण्यात आले असून त्यातून २०२०३ क्युसेक्स इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे .



