अहमदाबाद- गोरखपुर विशेष गाड़ीच्या वेळेमध्ये बदल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दिनांक 01.06.2020 पासून सुरु करण्यात आलेली गाड़ी क्रमांक 09089 / 09090 अप डाउन अहमदाबाद – गोरखपुर या विशेष गाड़ीच्या वेळेमध्ये दिनांक १ जुलै २०२० पासून बदल करण्यात आला आहे .
त्यानुसार अहमदाबाद येथून डाऊन मार्गावर १०.४० वाजता प्रस्थान करून सूरतला 2.25/02.30 आगमन प्रस्थान राहिल तर भुसावळ ला 7.35 ला आगमन आणि 07.45 ला प्रस्थान , खंडवा येथे 09.35आगमन आणि 09.40 ला प्रस्थान , इटारसीला 12 वाजता आगमन आणि 12.05 ला प्रस्थान करून गोरखपुर येथे सकाळी 8 वाजता ही गाडी पोहचेल .
अप दिशा ला गोरखपुर हुन 10.00 वाजता प्रस्थान करुण दुसऱ्या दिवशी खंडवा स्टेशन ला आगमन 06.30 आणि प्रस्थान 06.35, भुसावळला आगमन 08.40 आणि प्रस्थान 08.45 , सूरतला आगमन 2.35 /2.40 , बरोदरा येथे आगमन 4.30 आणि प्रस्थान 4.35, आणि अहमदाबाद येथे 6. 35 ला आगमन होइल .असि रेल्वे प्रशासनाने कळविले असून
प्रवाशानी याची नोंद घ्यावी .असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *