भुसावळ- आठवडे बाजारातील अप्सरा दुकानाच्या मागे दोन दुकानातून ६९ हजाराचे साहित्य चोरून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना दि.१९ जुन रोजी सायंकाळी ७ ते २० जुन सकाळी १० वाजेदरम्यान घडल्या होत्या.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. स्थानिक हनुमान नगर मधील दिलीप घनश्याम उदासी यांच्या गोडाऊनचा पत्रा वाकवून
कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ५९ हजार रु.किमतीचे बेंटेक्सचे दागिने चोरून नेले होते.तर गौसिया नगर मधील बिलाल शहा मुझफ्फर शहा यांच्या याच भागातील गोडाऊन मधून १० हजार रु. किमतीच्या साडीचे लेस व लटकन हा ऐवज चोरून चोरटे पसार झाले होते.
सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित सोनू मोहन अवसरमल(वय २२) रा.वाल्मिक नगर,आकाश बाबुराव इंगळे(वय २८),रा.राहुल नगर व चेतन पुंजाजी कांडेलकर(वय२९) रा.पंचशील नगर या तिघांना राहूल नगर भागातून सापळा रचून सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले .
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,पोना.किशोर महाजन,रमण सुरळकर,रवींद्र बिऱ्हाडे,तुषार पाटील,महेश चौधरी,पोकाॅ. विकास सातदिवे,प्रशांत परदेशी, श्रीकृष्णा देशमुख,ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे यांनी केली.



