चार दिवस फोटो स्टुडिओ उघडे ठेवण्यात यावे – फोटोग्राफर असोसिएशनची मागणी ; निवेदन सादर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा , जास्त गर्दी होउ नये याकरीता शासनाने व्यावसायिकांना काही ठराविक दिवस ठरवून दिले आहे त्यानुसार फोटोग्राफर यांना दोन दिवस दिले मात्र दोन दिवस अवधी फार कमी पडतो त्यामुळे हा अवधी चार दिवस द्यावा जेणें करून स्टूडिओत गर्दी होणार नाही अशी मागणी भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन यांनी केली असून याबाबत शुक्रवार रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे .
निवेदनात नमूद आहे की निर्गमित केलेल्या आदेशात दोन दिवस दिले आहे मात्र दोन दिवसांत जॉब व डीलेव्हरी देता येत नाही , वारंवार खंडित होणारी विज आदीं समस्या येत आहे यामुळे दोन दिवसां ऐवजी चार दिवस स्टुडिओ उघडे ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना लागणाऱ्या पासपोर्ट फोटोची सुविधा पुरवता येईल ,शहरात एकूण ३० पेक्षा अधिक फोटो स्टुडिओ चालक आहेत , म्हणून दोन दिवसां ऐवजी चार दिवस स्टुडिओ उघडे ठेवण्याची मागणी शासनाने मान्य करावी अशी विनंती केली असून याबाबत निवेदन भुसावळ फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी
रामसींग सुलाने मुख्याधिकारी किरण सावंत,तहसीलदार दीपक धीवरे,यांना देण्यात आले.
यावेळी फोटोग्राफर असोसीएशनचे उपाध्यक्ष बबलू ब-हाटे , कोषाध्यक्ष किशोर शिंपी , यांचेसह संघटनेचे मोजकेच सदस्य उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *