भुसावळच्या लाहोटी परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम ; लॉकडाऊन काळात गिरवले योगाभ्यासाचे धडे ;


भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कित्येकांना जीवन नीरस व कंटाळवाणे वाटायला लागले तर काहींनी सुट्टी लागल्याप्रमाणे केवळ मनोरंजन व आरामास प्राधान्य दिले परंतु काही लोक असेही होते की या लॉकडाऊनचा त्यांनी सकारात्मक उपयोग करायला सुरुवात केली, कुटुंबासाठी वेळ दिला शिवाय आरोग्य सुदृढ करण्यात या लॉकडाऊन चा उपयोग केला. राधेशाम लाहोटी यांचे कुटुंबीय देखील यापैकीच एक होय.
राधेश्याम लाहोटी यांचा पारंपरिक धान्याचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे .त्यांचा मोठा मुलगा ब्रिजेश सी.ए. असून तोदेखील कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावतो. शिवाय पुतण्या निलेश, बहिणीचा मुलगा नकुल हादेखील हा पारंपरीक व्यवसाय एकत्र सांभाळतात. हे संपूर्ण कुटुंब एकत्रीत कुटुंब असून एकत्र व्यवसाय सांभाळतात परंतु व्यवसायात कायम व्यस्त असल्याने त्यांना कुटुंबासाठी व आरोग्यासाठी एकत्रीत वेळ देता येत नसे. राधेशाम लाहोटी हे राधाकृष्ण प्रभात फेरीचे प्रमुख प्रनेते असून दररोज सकाळी 5:55 ते 6:30 या वेळेत ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असले तरी या प्रभातफेरीचे आयोजन होत असते परंतु लॉकडाऊन मुळे खंड पडला त्याचप्रमाणे ब्रीजेश, निलेश व नकुल हे भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे सदस्य असून ते नियमित मंगळवार, गुरुवार व रविवारी धावण्याचा सराव करतात परंतु लॉकडाऊनमुळे त्यातही खंड पडला. अशावेळी संपूर्ण कुटुंबाने आपले फिटनेस कायम ठेवण्यासाठी सोबत योगासने व व्यायाम करण्याचे ठरवले त्यानुसार दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत योगासन व व्यायामास सुरुवात केली. सुरुवातीला अवघड वाटणारा हा प्रवास आता सहज व नित्याच्या झाल्याचा आनंद आहे, असे सुनबाई संजीवनी ब्रिजेश लाहोटी सांगतात. तसेच लहान मुलांसोबत सासू-सासरे यांच्या प्रेरणेमुळे योगाभ्यास सुरू केला व कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे, अशी त्यांची लहान सुनबाई सुरभी निलेश लाहोटी या अभिमानाने सांगतात. भविष्यात देखील योगाभ्यास, व्यायाम सहकुटुंब कायम करणार असून त्यामुळे शरीरस्वास्थासोबतच कुटुंबास गुणवत्तापूर्ण वेळ देणे शक्य होईल, असे संपूर्ण कुटुंबाचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *