भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या असून प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांनी शहरातील हॉस्पीटल आणि मेडीकल दुकानेच केवळ २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले असून अन्य व्यावसायीकांना दुकाने उघडण्यासाठी देण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. शुक्रवार पासून या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून ठरावीक दिवशीच उघडता दुकाने उघड़ण्यास परवानगी दिली असून नियम मोडल्यास दुकानदारांवर गुन्हे दाखल होणार असल्याचेही सांगितले .
यामध्ये रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवारी
शहरातील इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी शॉप, हायजीन सॅनिटेशन, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, बुक स्टोअर्स, बेकरी, कॉस्मेटीक, टॉइज,गिप्ट, कन्फेक्शनरी, बॅटरीज, धान्य, मिठाइ
ही दुकाने रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवारी या दिवशी सकाळी ९ते सायंकाळी ५ याच वेळात सुरू राहणार आहेत.
शनिवार, मंगळवार, गुरूवारी ही दुकाने राहणार उघडी
शहरातील फळे व भाजीपाला, कापड दुकाने, रेडीमेड शॉप, होजिअरी,फर्निशींग, साडी, टेलर शॉप, वाईन शॉप, मटण शॉप, बुट, चप्पल दुकाने, लॉण्ड्री ही दुकाने शनिवार, मंगळवार आणि गुरूवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात उघडी राहणार आहेत.
सोमवार, मंगळवार, गुरूवारी ही दुकाने सुरू
सर्व प्रकारच्या वाहनांचे शोरूम, सर्व वाहनांचे गॅरेज, सायकल मार्ट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरीयल, प्लायूड, कलर शॉप, सॅनेटरी पाईप व पंप्स, आसारी, पंक्चरची दुकाने ही दुकाने सोमवार, मंगळवार, गुरूवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ याच वेळात उघडी राहणार आहेत.
शुक्रवार व शनिवारी ही दुकाने राहणार सुरू
शहरातील भाड्यांची दुकाने, फर्निचर, बॅग हाऊस, मोबाईल दुकाने, घड्याळ दुकाने, मोबाइॅल रीपेअरींग, ऑप्टीकल, प्रिंटीग प्रेस, प्रॉपर्टी ब्रोकर्स ही शुक्रवार आणि शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात सुरू राहतील.
दुध, पेट्रोल पंप सर्व दिवस सुरू
शहरातील दुधाची दुकाने आणि पेट्रोल पंप हे सर्व दिवस सुरू राहणार असून याची वेळ सकाळी ७ ते ११ व दुपारी ४ ते ८ याच वेळात सुरू राहणार आहे.



