दातृत्व ; शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या योद्ध्याना राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नितिन धांडे यांच्यातर्फे पीपीई कीट व सॅनीटायझर वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना या महामारीच्या संकट काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या योद्ध्यास राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नितिन धांडे यांच्यातर्फे पीपीई कीट व सॅनीटायझर देवून गौरविण्यात आले .
शहरातील डाॅ विजेश चौधरी, डाॅ विनायक महाजन, डाॅ नितीन पाटील, डाॅ अमित देवडा, डाॅ लक्ष्मीकांत नागला ,अँब्यूलन्सचे चालक रवी पाटील ,सुमधूर फाऊंडेशन सातत्याने अहोरात्र रुग्नांची सेवा करीत आहे . कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या या लढाईत आजारी नागरिकांची सेवा करतांना या डॉक्टरांना अनेक अडचणी निर्माण होतात याकरीता येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे यांच्या तर्फे यांना पीपीई कीट, सॅनीटायझर व बुके देऊन या योद्ध्याचे कौतुक करण्यात आले .
यावेळी अजय येवले ,सदानंद वराडे ,नारायण तांबट ,नरेश बि-हाडे ,नंदु चौधरी , उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *