नागरिकांनी घरातच राहावे आमदार संजय सावकारे यांचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नागरीक कोरोनाचे विषाणूंच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या मध्ये अधिक वाढ होउ नये म्हणून आता तरी नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले आहे.
शहरातील समता नगर,सिंधी कॉलनी,पंचशील नगर, शांती नगर भागातील दिड किलोमीटरचा परिसर सील करण्यात आलेला आहे. नागरिक गांभीर्य लक्षात घेत नसल्याने आज ही वेळ आली आहे.अजूनही वेळ गेलेली नाही यासाठी आमदार संजय सावकारे कडून नागरिकांना घरातच बसण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे . यानंतरही नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्यास कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यास प्रशासन एवढ्या मोठ्या परिसरात कुठे-कुठे पोहचणार म्हणून आपणच आपले रक्षक व्हावे याकरीता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे . कोरोनाला भुसावळातून हद्दीपार करणे शक्य आहे नागरिकांनी जर आपली काळजी स्वतः घेतल्यास कोरोनाच्या संख्येत नक्की घट होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *