भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात कोरोना रुग्णाची संख्या पाच झाली असून .या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील ‘त्या’ भागांना सील करण्यात आले आहे त्या बाधित रुग्णाच्या परिवार व परिसरातील रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने शांती नगर परिसर सील करण्यासाठी दिनांक २८ एप्रिल रोजी प्रांत कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.
यामध्ये शहराला बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. सील करण्यात आलेला परीसर सोडून बाकी परिसर सुरू ठेवण्यात आलेला आहे.तसेच प्रशासनाने शहरात कोरोनाच्या रुग्णासाठी केव्हीड केअर सेंटर सुरू करून ६५० बेडची व्यवस्था केलेली आहे.अशी माहिती पत्रकारांना प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांनी यावेळी दिली.यावेळी तहसिलदार दिपक धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पालिका मुख्याधिकारी करुणा
डहाळे,पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे , रामकृष्ण कुंभार, डॉ कीर्ति फलटंकर आदीं उपस्थित होते .



