कोरोना चा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासना तर्फे सर्वतोपरी प्रयत्न ; रेल्वे कॉलनीत अपरिचितास जाण्या व येण्यास मनाई ; कॉलनित सूचना फलक लावली

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि अप्पर मंडळ प्रबंधक मनोज कुमार सिन्हा यांच्या आदेशानुसार वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार आज ३१ मार्च मंगळवार रोजी भुसावळ येथील सर्व रेल्वे कॉलनी परिसरामध्ये महत्वाच्या प्रवेशद्वाराच्या गेटवर कोविंड 19 चा दुष्प्रभाव रोखण्यासाठी महत्त्वाचे सूचनाफलक लावण्यात आले . या सूचनाफलकांमध्ये विविध सूचना देण्यात आल्या असून यामध्ये महत्त्वाची सूचना अशी आहे की कोणत्याही बाहेरील व्यक्तीस रेल्वे कॉलनी व रेल्वे आऊट हाऊस मध्ये परवानगी देण्यास मनाई केली आहे .तसेच जे कोणी बाहेरून आले असेल त्याची माहिती रेल्वे प्रशासनाला त्वरित देण्यात यावी. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच बाहेरील व्यक्तीस प्रवेश वा परवानगी नाही किंवा प्रवेश देऊ नये जेणेकरून आरोग्यास धोका होईल किंवा कोरोना सारख्या रोगाचा दुष्प्रभाव वाढेल. असे सूचनाफलक सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे व सर्व कल्याण निरीक्षक यांनी रेल्वे कॉलनी मध्ये जाऊन सूचनाफलक लावले .तसेच भुसावळ रेल्वे विभाग येथे सर्व स्टेशन या ठिकाणी सुद्धा हे सूचनाफलक लावण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *