भुसावळात साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे निराधारांना जीवनावश्यक वस्तुं घरपोच मिळणार ; संपर्क साधावा ट्रस्ट तर्फे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या संकटकाळात भुसावळ शहरातील गोरगरीबांना येथील साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे मदतीचा हात देण्यात येऊन आधार देण्यात येत आहे . कोविड १९ विषारी वायुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात संचारबंदी आदेश लागू आहे .यामुळे गरीब व निराधार यांच्या हाताला काम नाही , मोलमजूरी नाही यामुळे त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार या चिंतेने अस्वस्थ झालेल्या गरीब गरजु निराधार यांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येवून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न येथील साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे अध्यक्ष संतोष चौधरी यांचेतर्फे करण्यात आला आहे .
यामध्ये खादय तेल – १किलो, साखर १ किलो , चहा पावडर २५० ग्राम ,तूर डाळ , १किलो,साबण१० नग,
मिरची पावडर – २०० ग्राम,हळद पावडर १०० ग्राम,लसुण अर्धा किलो,बटाटे ५ किलो,कांदे ३ किलो, या वस्तुंचा समावेश आहे .
आजच्या या संकटकाळातील बेरोजगार झालेले कामगार, मजूर, अनाथ, गरीब व गरजू कुटुंब
ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांनीच ९९२२५९०४५० या मोबाईल नंबरवर व्हाटसअॅप, मेसेज (संदेश), व्दारे
किंवा फोन लावून आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक देऊन नोंदणी करावी त्यांना त्वरित वरील जिवनावश्यक वस्तू घरपोच पाठविण्यात येतील.असे आवाहन साईबाबा मंदिर ट्रस्ट तर्फे अध्यक्ष तथा माजी आ. संतोषभाउ चौधरी यांनी जाहिर आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *