मालेगाव शहरातील माजी नगरसेवकाचे घरावर फायर करणारा सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुलसह जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मालेगाव –
मालेगाव शहरातील रहिवासी माजी नगरसेवक तथा प्राध्यापक रिजवान
खान अमानऊल्ला खान, वय ५०, रा. महेशनगर, प्लॉट नं.२९, मालेगाव हे त्यांचे राहते घरात रात्रीचे वेळी झोपलेले असतांना. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मध्यरात्री २ वाजेचे सुमारास अज्ञात दोन इसमांनी त्यांचे घराबाहेर येवुन रिजवान बहार निकल असे जोरात ओरडून त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्टलने त्यांचे घराचे खिडक्यांमधुन फायरिंग केल्याची घटना घडली होती. सदर घटनेबाबत मालेगाव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. १५/२०२० भादवि कलम ३०७,४२७,३४ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदिप घुगे यांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेवुन आरोपींना तातडीने अटक करणेसाठी मार्गदर्शन केले, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांचे पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. या गुन्हयातील अज्ञात आरोपी हे मालेगाव शहरातीलच असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली, त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत चिकाटीने तपास करुन मालेगाव शहरातील नागझाप झोपडपट्टी परिसरातुन सराईत गुन्हेगार आरोपी शेख इमान शेख खालिद उर्फ इम्रान बाचक्या, वय २७ रा. अख्तराबाद देवीचा मळा, मालेगाव, मुळ रा. अजमेरानगर, धुळे, जि.धुळे यास सापळा रचुन ताब्यात घेतले, त्याचे कब्जात पॅन्टला कमरेस लावलेले एक गावठी पिस्टल मॅगझिनसह मिळुन आले. सदर आरोपीने त्याचे साथीदारासह मिळुन २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीचे सुमारास मालेगाव शहरातील महेशनगर परिसरात राहणारे रिजवान खान यांचे घरावर त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्टलमधुन फायर केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेला आरोपी शेख इम्रान उर्फ इम्रान बाचक्या याचे कब्जातुन एक गावठी पिस्टल, मॅगझिन व गुन्हयात वापरलेली बजाज पल्सर १५० मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे. वरील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचेविरूध्द मालेगाव व धुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मालाविरूध्द व शरिराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहे. यातील अटक आरोपीचे साथीदाराचा स्थागुशाचे पथक कसोशिने शोध घेत असुन अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदिप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, सपोनि संदिप दुनगहू, सपोनि स्वप्निल राजपुत, सपोउनि सुनिल आहिरे, पोहवा रविंद्र वानखेडे, सुहास छत्रे, वसंत महाले, पोना चेतन संवत्सरकर, राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, पोकॉ गिरीष बागुल, रतिलाल वाघ, दत्ता माळी, प्रदिप बहिरम, संदिप लगड, गौरव पगारे, चालक पोकॉ योगेश गुमलाडू, खांडेकर यांचे पथकाने मालेगाव शहरातील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *