तापी नदीपात्रात भुसावळातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

भुसावळ येथील सिंधी काॅलनी भागातील बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय तरूणाचा तापी नदीपात्रात रविवार 1 मार्च रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने सिंधी कॉलनीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचा आत्महत्येने मृत्यू की घातपाताने मृत्यू? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे.
शहरातील सिंधी कॉलनी भागातील रवी मुलचंदानी (वय ३०) हा युवक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वाजेचे सुमारास रवी मूलचंदानी आपल्या मोबाईल दुकानावर नेहमीप्रमाणे शनिवारी जाण्यासाठी निघाले मात्र घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला होता. घरच्या लोकांनी सर्वत्र तपास केला मात्र कुठेही न आढळून आल्याने हरविल्याची तातपूर्ती तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली होती .
दरम्यान आज 1 मार्च रोजी अंजाळ्या जवळील तापी नदी पात्रातील खदाणीत काम करणाऱ्या मजुरांना पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसल्याने त्यांनी मृतदेह काढला.घटनास्थळी नजिकच मयताची मोटरसायकल होती . यावरून कामगारानी त्वरित क्रशर मालक यांना कळविले व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली . मोटरसायकल वरुन तपास केलाअसता मयत युवक हा सिंधी कॉलनी येथील रहिवासी असून रवी प्रकाशलाल मूलचंदानी (वय ३० ) असल्याचे निष्पन्न झाले. यावल पोलिस ठाणे हद्दीतील या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत रवी मूलचंदानी याच्या मृत्युचे नेमके कारण हत्या की आत्महत्या ? याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत .
दरम्यान मृतदेह शवविच्छेदनाकरीता जळगाव सामान्य रुग्णालयात पाठवींन्यात आला आहे. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परीवार आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली असून या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास एएसआय नेताजी पंडित वंजारी करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *