अक्षय उर्फ भैंस की मुंडी गुन्हे पोलीसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ शहरातून एक वर्षे करीता हद्दपार असलेला आरोपी अक्षय उर्फ भैंस की मुंडी याच्या येथील टिंबर मार्केट परिसरातुन गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या . 29 रोजी रात्री 9.40 वाजता पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या बातमी वरून एक वर्षे करीत हद्दपार असलेला आरोपी अक्षय उर्फ भैंस की मुंडी कैलास बडगुजर (वय २२) रा.अण्णा भाऊ नगर भुसावळ हा टिंबर मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या फिरतांना मिळुन आला असल्याने त्यास अटक करण्यात आली .
बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध भाग 6 गुरन 0071/2029 महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951कलम-142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी. अनिल मोरे, संदीप परदेशी, पो.ना.रविंद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, पो.का.विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशानी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *