अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक

भुसावळ( प्रतिनिधी)-
शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या युवकास अटक करण्यात आली असून येथील शहर पोलीस स्टेशन भाग-५ गुरनं-३६/२०२० भादंवि कलम-३६३ फोस्को ११ (४),१२ प्रमाणे फोस्को गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी विशाल सुनिल रायमळे राहणार आंबेडकर नगर याने डी.एस.हायस्कुल मध्ये १२ वी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीने पीडितेच्या राहत्या घरुन दिनांक २३ फेब्रुवारी रोजी १२.३० वाजता ते सकाळी २.३० वाजेच्या सुमारास पळवून नेले .याबाबत पीडित मुलीच्या आईने आरोपी विरुध्द फिर्याद दिल्यावरुन शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दरम्यान आरोपी विशाल सुनिल रायमळे यास अटक करण्यात आली असून पोलिस उपनिरिक्षक वैभव पेटकर तपास करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *