भुसावळ – मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन,जळगाव तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सोहळा दि.२३फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला.
यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य अशा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यात भुसावळ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.राजश्री उमेश नेवे यांना “आदर्श समाज सेविका पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे तथा ग.स. सोसायटी अध्यक्ष मा. मनोज पाटील हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डीगंबर देवांग, उद्योजक अनिल कासट, साहित्यिक अ.फ. भालेराव, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, अँड. स्वाती निकम, माता रमाई महिला मंडळच्या अध्यक्षा शुभांगी बिऱ्हाडे, नोबल स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी, हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या संचालिका भारती काळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सलीम इनामदार, इम्रान शेख आदी उपस्थित होते.
सदर पुरस्कार सौ राजश्री नेवे यांना मिळाल्याने सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे .



