भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रंगोली हॉटेल जामनेर रोड मेडिकल जवळ एका मोठ्या नाली मध्ये अडकलेल्या गायीच्या वासराचे प्राण वसुंधरा गोसेवा परिवाराचे डॉ भरत महाजन यांच्या तत्पर योगदान व ईलाजामुळे तसेच महिलांच्या सतर्कतेने वाचल्याने परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .
22/02/2020 रोजी शनिवार दुपारच्या सुमारास डॉ.महाजन ड्यूटीवरुन घरी येत असताना रंगोली हॉटेल जामनेर रोड त्यासमोर मेडिकल जवळ एका मोठ्या नाली मध्ये एक गायीची वासरी (पिल्लू ) पडले होते .नाली मध्ये भरपूर पाणी असल्यामुळे तिच्या गळ्यापर्यंत पाणी होते ती आपला जीव वाचवण्याकरता बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती ,परंतु लहान असल्यामुळे आणि पाणी भरपूर असल्यामुळे तिला (वासारी ) ला बाहेर निघणे अशक्य होते दोन-तीन महिला हे दृश्य बघुन तिला मदत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. दरम्यान या रस्त्याने वसुंधरा गोसेवक परिवार संस्थापक डॉ. भरत महाजन हे गाडी ने जात असताना अचानक या घटनेकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच गाडी थांबवून तात्काळ तेथील धनु नामक व्यक्ती आणि इतर गो सेवकांना घटनास्थळी बोलावून घेतले .गो सेवक आणि नागरिकांच्या मदतीच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटात त्या लहान बासरीला नालीतून बाहेर काढले.त्या नालीमध्ये या लहान वासरी च्या गळ्यापर्यंत पाणी होते. लहान गोमाता मृत्यूशी झुंज देत होती अशा बिकट परिस्थितीतून त्या महिला भगिनींच्या सतर्कतेने तसेच गो सेवकांनी तेथील उपस्थित धनु नामक व्यक्ती आणि नागरिकांच्या मदतीने डॉ महाजन यांना तात्काळ त्या बासरीचे प्राण वाचवणे शक्य झाले. डॉ. महाजन यांनी त्वरित त्या वासरीवर उपचार करून तिला तिची आई (गोमाता ) व इतर गाई जवळ सुखरूप सोडले. गोसेवक. डॉ .महाजन.,जितु भाऊ, विशाल टाक, रोहित महाले, पवन बॉक्से, कृष्णा साळी,मयुर सावकारे ,लिटिल ,लकी, किरण पाटील ,राजू राजपूत, राजू ठाकूर, पियुष माळी, आणि इतर सर्व गोसेवक उपस्थित होते.प्रसंगी डॉ महाजन यांनी आवाहन केले की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची गोमाता किंवा गोवंश अशा अडचणीत जखमी किंवा कोणत्याही वाईट परिस्थितीत आढळल्यास आपण तात्काळ डॉ.महाजन किंवा वसुंधरा “गोसेवा परिवार भुसावळ यांच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या किंवा मोबाईलद्वारे वा कव्हाट्सअप मेसेज करून आपण आपल्या गोमातेला वाचवून तिची सेवा करुन पुण्याचे कार्य करू शकतात . तरीअशा परिस्थितीत गोमाता आढळल्यास तात्काळ वसुंधरा गोसेवा परिवार भुसावळ तसेच
डॉ महाजन यांच्याशी 8766771251 वरती संपर्क साधावा
गोमातेला सर्व वैद्यकीय सेवा स्वतः मोफत देत असून श्रीराम सेना ग्रुप. राजे ग्रुप व तेजस्विनी महिलाशक्ती संघ यांचेही सहकार्य लाभत आहे



