भुसावळ (प्रतिनिधी )-
अल्पवयींन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवुन नेवून अत्याचार करणारा फरार आरोपी अवघ्या २४ तासांच्या आत भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या जाळयात गवसला .भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील आखाडा भागातून आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पो स्टेशन गुरन 0047/2020 भादवी कलम- 376,363,366-अ,507 सह बालकांचे लैगींक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम-4,8,12 प्रमाणे दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी 8:20 गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील फरार आरोपी याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त बातमी मिळाल्यावरुन आरोपी शाहरूख शेख उर्फ रघु शाहबुद्दीन वय-22 रा. गांधी काॅलनी चित्रा टाॅकीजच्या मागे लालबाग बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)येथे राहणारा आहे तो भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील आखाडा भागात आल्याचे समजल्या वरुन सापळा रचून त्यास त्वरित ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक .डाॅ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके , पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक्क फौजदार तस्लिम पठाण,पो.हे.काॅ.अयाज सैय्यद ,पोलीस नाईक रमण सुरळकर,किशोर महाजन,संदेश निकम,पो.काॅ.विकास सातदिवे,रविंद्र तायडे,ईश्वर भालेराव अशांनी केली आहे.



