भुसावळ शहरात होमगार्ड कर्मचार्यांच्या मुकमोर्चाने वेधले लक्ष ; थकित वेतनासह विविध मागण्यांचे प्रांताना निवेदन सादर

भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र होमगार्ड यांचे गेल्या ६ महिन्यांपासुन चे थकित पगार (वेतन ) त्वरित मिळावे यामुख्य मागणीसह अनेक विविध मागण्यांकरिता गुरुवार दिनांक ६ फेब्रूवारी रोजी येथील तालुक्यातील सर्व होमगार्ड यांनी न्याय व हक्काकरीता शांततेच्या मार्गाने मुक मोर्चा काढला .
अनिल रामचंद्र धाइंजे व महिला होमगार्ड श्रीमती लोखंडे, चंडाले, दिलीपसिंग गुरु , भुसावळ (महाराष्ट होमागार्ड )यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला . मोर्चास जामनेर रोड वरील अष्टभुजा देवी मंदिरापासून सुरूवात झाली .मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरुन प्रांताधिकारी कार्यालयावर येवून धडकला . अहोरात्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दुय्यम पोलिसांची भूमिका बजावणाऱ्या होमगार्ड (गृहरक्षक दल ) वर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळण्या करिता याआधी अनेकदा निवेदन दिले मात्र याबाबत अद्याप ही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे .
विविध मागण्या याप्रमाणे
महाराष्ट्र होमगार्डच्या मागील सहा महिनेचे थकीत बिल (पगार) तात्काळ मिळण्यात यावे. उदा. पोळा, गोकुळअष्टमी, नवरात्र, विधान सभा निवडणुक २०१९, दैनंदिन बंदोबस्त (१ महीने व २ महिने) अशा सर्व बंदोबस्त बिल (मानधन) बाकी आहे. ते तात्काळ मिळण्यात यावे. १ जानेवरी २०२० रोजी महाराष्ट्र सरकार कहून परिपत्रक क्रमांक पत्र क्र.मस/कार्या-३/२०२०/७९ दिनांक १०/१/२०२० प्रमाणे महाराष्ट्र होमागाईतील ३० ते ३५ हजार होमागाई यांना देण्यासाठी शासनाकडे निधी नाही. म्हणून सर्वांना ड्युटीवरुन (सेवेवरुन) कमी करण्यात आले. या सर्वाना पुन्हा सेवेत बंदोबस्त कामी रुजू करावे . राज्यातील ५०/५५ वय वर्ष असलेले पुरुष व महिला यांना विविध कारणाने पात्र केलेले आहे त्यांना बिनशर्त परत घ्यावे. शनिवार रोजी केलेली साप्ताहिक कवायत रद्द करण्यात यावी व पूर्वी प्रमाणे महिण्यातून ४ रविवार साप्ताहिक कवायत चालु करण्यात यावी महाराष्ट्र होमगार्ड यांना इतर राज्या प्रमाणे उदा. मध्य प्रदेश, पंजाब, या राज्यामध्ये होमगार्ड यांना ३६५ दिवस ड्युटी
मिळते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र होमगार्ड यांना वर्षभर ड्युटी (सेवा) ३५६ दिवस मिळावी या विविध मागण्यां करण्यात आल्या असून याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले . मोर्चात भुसावळ तालुक्यातील सुमारे 300 होमगार्ड कर्मचारी व महिला होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते .

ps://youtu.be/upKDSOaWsS4

https://youtu.be/upKDSOaWsS4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *