अमृत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी , अन्यथा जेलभरो आंदोलन -माजी आमदार संतोष चौधरी

भुसावळ (प्रतिनिधी )- अमृत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी , जनतेला त्रास देणाऱ्या या भ्रष्टाचारी नगराध्यक्षांणा लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून बड़तर्फ करावे अशी मागणी केली असून यासंदर्भात लेखी तक्रार दिली असल्याचे सांगितले .
चौकशी होवून गुन्हे दाखल न झाल्यास जेलभरो आंदोलन करणार असल्याचे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले . स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे सोमवार 3 फेब्रूवारी रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . शहरातील अमृत योजनेच्या कामासह रस्त्याची दुर्दशा , गटारी, अस्वच्छता यांमुळे शहराची अत्यंत बिकट व दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना अत्यंत यातना भोगाव्या लागत आहे . एवढेच नव्हे तर रस्त्याने अनेकांचे बळी घेतल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध आता तुटला आहे . याकरीता त्रस्त झालेल्या जनतेच्या न्याय व हक्काकरीता महायुतीने पुढाकार घेतला असून या संदर्भात तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सोमवार रोजी देण्यात आले .
भुसावळच्या या दयनीय परिस्थिती करणाऱ्यां 22 प्रकरणाबाबत व बेकायदेशीर कामे या माध्यमातून याविरुद्ध जनहित याचिका हाईकोर्ट येथे दाखल करण्यात येणार आहे . तसेच अमृत योजनेचे मुळात टेंडरच बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी आ . संतोष चौधरी यांनी करीत या काम दिलेली जैन कंपनी ही बेकायदेशीर असून ब्लैक लिस्ट मध्ये आहे या कंपनीच्या भ्रष्टाचाराचा घरकुल घोटाळ्यातही समावेश आहे . या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांचे सह मंत्रालयापर्यंत संबंधित विभागात देण्यात येणार असल्याचेही सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ताब्यात रोड आहे की पालिकेच्या ताब्यात रोड हे बघून संबंधित विभागाने खोदकाम करून काढण्यात आलेले पाइप जप्त करून दोषीविरुद्ध त्वरित गुन्हे दाखल करावे . भुसावळ पालिकेच्या यां भ्रष्ट व भोंगळ कारभारा विरुद्ध त्वरित निर्णय न घेतल्यास महायुतीच्या माध्यमातून लवकरच जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे .
केंद्र शासनाने जाहिर केलेले निराशाजनक व बेरोजगारीत वाढ करणारे असल्याचे माजी आ संतोष चौधरी म्हणाले तसेच या बजेट मध्ये रोजगार वाढी बद्दल कोणता च विषय नाही खाजगिकरणा चा फटका सर्वच बेरोजगाराना होणार आहे .
शहरातील अमृत योजनेच्या पाण्याचा स्त्रोत नसतांना रस्ते खोदून पाईप लाईन टाकण्यात आली होती ती पुन्हा खोदकाम करुन काढण्यात येत आहे. आपल्या काळात याच योजनेसाठी हतनूर धरणावरुन पाणी घेण्याचे नियोजन होते. मात्र आताच्या सत्ताधार्‍यांनी शेळगाव बॅरेजवरुन उलट्या प्रवाहाने पाणी आणण्याचा प्रयत्न केला होता. पाईपलाईनवर आतार्यंत झालेला सर्व खर्च ठेकेदाराकडून वसुल करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तहसिलदार दिपक धिवरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, जनाधार यांनी महाआघाडीच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आल्याचे माजी आ. संतोष चौधरी यांनी सांगितले.
मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करुन त्यांनी याबाबत पाठपुरवा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. अमृतचे काम ठेकेदार जैन कंपनीकडून काढून चांगल्या कंपनीला देण्यात याव अशी मागणी माजी आ. चौधरी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने केली. भुसावळ व वरणगावत यापुढील निवडणुका महाआघाडीच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी आपण पालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. मात्र नागरिकांना अद्याप दिलासा मिळाला नाही.याबाबत लवकरच जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनीसांगितले.
जनाधार राष्ट्रवादीत विलीन
दरम्यान, पालिकेतील विरोधी गट जनआधार पार्टीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा ठराव ३ रोजी पार पडलेल्या जनआधार विकास पार्टीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष सचिन चौधरी यांच्या उपस्थिती करण्यात आला. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकुर हे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन नगरसेवकांचा गट तयार करण्यात येणार आहे.
नगराध्यक्षांना अपात्र करा
कलम ५८ नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल करुन अपात्र करण्याची मागणी करण्यात येणार आहे. शहरातील विविध २२ प्रकरणांबाबत जनहित याचिकेद्वारे चौकशीची करुन दोषिंवर कारवाई करण्याची मागणी करण्या येणार आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवींद्र निकम,शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश महाजन, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बुटासिंग चितोडीया यांनीही पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती
उमेश नेमाडे,उल्हास पगारे,हाजी आशिक खान,दीपक मराठे, राहुल बोरसे,इम्तियाज शेख, दुर्गेश ठाकूर,अशोक(आऊ) चौधरी,साजिद शेख,सचिन पाटील,प्रकाश निकम,मुन्ना सोनवणे,संतोष सोनवणे,युवराज पाटील,इलियास शेख,संतोष माळी,पुनम बऱ्हाटे,भुराबाई चव्हाण,भिमराज कोळी,युनूस बेग,शैलेश अहिरे,सागर कुरेशी, विलास खरात, निखिल भालेराव, नामदेव बऱ्हाटे,विकी चव्हाण, गोकुळ बाविस्कर,सिद्धार्थ सपकाळे,नईम बेग,नईम शेख, प्रा.धीरज पाटील,सनी गोने, गोकुळ बाविस्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *