भुुसावळ- दी 28 (प्रतीनिधी ) -मध्य रेल्वे हे जसे भारतीय रेल्वेचे हार्ट आहे त्या प्रमाणे भुसावळ विभागसुद्धा मध्य रेल्वेचे हार्ट असल्याचे प्रतिपादन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी केले .
या स्थानकावरून देशात कोठेही जाण्यासाठी सोयीचे असते रेल्वे बोर्डाचा या विभागाकडे विशेष लक्ष असून विभागात अतिक्रमण मोहीम हटविल्यानंतर त्यावर करण्यात आलेले नियोजन यात भुसावळ मध्ये एलएचलबी कोचेसची निर्मिती होणार असून मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातील प्रवासी गाड्यांचा व्यस्तता कमी करण्यासाठी भुसावळ -बडनेरा -वर्धा तिसरी रेल्वे लाईन विचाराधीन आहे. व भुसावळ विभागातील प्रवाशांना मुंबईसाठी भुसावळ वाया जळगाव- सुरत प्रवासी गाडी प्रस्तावित असून ती सुरू केल्यास मनमाड इगतपुरी रेल्वे रुटचा ताण कमी होईल तसेच गुजरात कडे जाणाऱ्या प्रवाशांची सोयीचे होईल हे गाडी प्रस्तावित आहे. भविष्यात भुसावळ विभागातून जलद गतीने प्रवासी गाड्या सुरू व्हाव्या यासाठी बडनेरा ते भुसावळ दरम्यान झालेला विशेष निरीक्षण गाडीने ताशी १२५ च्या गतीने परीक्षण करण्यात आली असल्याची ही माहिती मध्य रेल्वेचे व्यवस्थापक डी के शर्मा यांनी डीआरएम कार्यालय येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान सर महाव्यवस्थापक डी के शर्मा हे ०६:५५ ला विशेष गाडीने फलाट क्रमांक ८ वर आले सर्वप्रथम त्यांनी स्वयंचलित जिन्याचे निरीक्षण केले व यानंतर खडकी पुणे येथुन आणलेल्या बॅटल टँक-५५ रणगाड्याचे उद्घाटन केले तसेच स्थानकावर सुशोभीकरण, करण्यात येणाऱ्या सर्व कार्याचा आढावा घेतला.

पाहणी दौर्या दरम्यान त्यांचे समवेत डीआरएम आर.के.यादव यांच्यासह एडी आरएम मनोज कुमार सिंन्हा , रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी ऐ. के .श्रीवास्तव , एस .पी .वावरे , डी .के सिंग, शैलेन्द्र कुमार , मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी , प्रशासकीय अधिकारी निर्माण एस के तिवारी , प्रधान मुख्य इंजीनियर एस . के .अग्रवाल , मुख्य कार्मिक अधिकारी एन स्वामीनाथन , प्रिंसिपल चीफ मेकेनिकल इंजी. मनोज जोशी, यांचेसह अधिकारी सहभागी झाले होते .
महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले की,.सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून भुसावळ विभागातील आठ स्थानकावर आडव्हान्स टेक्नॉलॉजीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. भुसावळ स्थानकाचा ताण कमी व्हावा यासाठी लवकरच भुसावळ- बडनेरा -वर्धा तिसरी रेल्वे लाईन तसेच भुसावळ जळगाव व्हाया सुरत ही मुंबई प्रवासी गाडी सुरू करण्याचीही यावेळी माहिती शर्मा यांनी दिली. भविष्याचा विचार केला असता काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करून भुसावळ विभागातून कोणत्या गतीने गाडी चालवायची हे निश्चित केले जाईल. व आज प्रात्यक्षिक म्हणून निरीक्षण गाडीतून काशी १२५ कि.मी. ने गाडी चालविण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली
पाचोरा -जामनेर रेल्वे लाईन ब्रॉडगेज प्रस्तावित
पाचोरा- जामनेर ही पीजी लाईन ब्रॉडगेज साठी प्रस्तावित असून पुढे या मार्गाला बोदवडला ही जोडणी शक्य असून यामुळे जळगाव -भुसावळ दरम्यान चा प्रवासी गाड्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल असेही यावेळी शर्मा यांनी सांगितले
यादव यांचा कार्य गौरवास्पद
फार कमी वेळेत डी आर एम आर के यादव यांनी अतिक्रमण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली, व मोहिमेदरम्यान त्यांनी स्थानकावरील दोन्ही प्रवेश द्वाराचे सौंदर्यीकरण चे कार्यही जलद गतीने केले तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गौरवास्पद कार्य केले. व इतर कामाचा आढावा घेऊन त्यातही शर्मा यांनी यादव यांनी मेरीट चे गुण दिले .डीआरएम यादव यांच्या कार्यकाळातील काम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे सांगत डीआरएम यांच्या कार्याचे कौतुक करीत प्रशंसा केली


