उद्धव ठाकरे यांच्या सभेला भुसावळचे शिवसैनिक निघाले, विठुरायाकडं साकडं घालणार !

भुसावळ दी .23 (प्रतीनिधी ) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महासभेसाठी शिवसेनेच्या भुसावळ पदाधिकाऱ्यांनी कसून मेहनत घेत, या सभेला शिवसैनिक, युवासैनिक तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय ठेवण्यासाठी तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका आणि शहरातून जय हरी विठ्ठल !  शिवसेना झिंदाबाद’ उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ,”जय महाराष्ट्र ! म्हणत पंढरपूरला रवाना झाले.संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरच्या तिर्थक्षेत्र परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक व रामभक्तांचा मेळावा २४ डिसेंबर २०१८ ला आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भुसावळातील शिवसैनिक, हरी भक्तांनी व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केले होते, त्याअनुषंघाने आज दिनांक २३ रोजी संध्याकाळी भुसावळ विभागातील शेकडो शिवसैनिक पंढरपूरकडे निघाले आहे.
विठुरायाकडं साकडं घालणार: चंद्रकांत पाटील
राम मंदिर उभारणीसाठी भाजप सरकारनं गेल्या साडेचार वर्षात काहीही न केल्याचं शिवसेनेतर्फे चलो अयोध्या अशी हाक दिली आता चलो पंढरपूर अशी हाक शिवसेनेनं दिली आहे. तर अयोध्येप्रमाणेच पंढरपूर दौऱ्यातही राम मंदिर हा प्रमुख मुद्दा असणार आहे. कारण राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला द्या असं साकडंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी विठुरायाकडे घातलं जाणार आहे, असे जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी कळवलं आहे.’पहिले मंदिर, फिर सरकार’चा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरयूतीरावर महाआरती केली. तसेच महामेळावा घेतल्याने रामभक्तांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता पंढरपूर क्षेत्रात चंद्रभागेतीरी सोमवार २४ डिसेंबरला शिवसैनिक व रामभक्तांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला भुसावळ विभागातील सर्व शिवसेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी पंढरपूर मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पूर्ण केले, असे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी कळवले आहे. पंढरपुर सभेसाठी शिवसेनेच्या महिला जिल्हा। संघटक सौ  पूनम ब-हाटे , तालुका संघटक उज्वला बागुल , शहर प्रमुख भुराबाई चव्हाण , जी प सदस्य सरला कोळी यांचेसह महिला पदाधिकारी  व शेकडो  शिवसैनिक व महिला निघाल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *