भुसावळ दी 17 (प्रतीनिधी )- भुसावळ रेल्वे विभागाच्या ३७ तिकीट निरीक्षक कर्मचार्यांनी नोव्हेंबर १८ मध्ये ४.५७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. याबद्दल डीआरएम आर. के. यादव यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार उपस्थित होते. डिआरएम यांनी कर्मचार्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल कर्मचार्यांचे कौतुक करत भविष्यातही असेच कार्य करत रहा असे आवाहन केले. पारितोषिक प्राप्त तिकीट तपासनीस ज्याप्रमाणे टि.सी. बी पी सिंह , विनय ओझा, आर. के. गुप्ता (भुसावळ), एम. एम.शिंदे (मनमाड),महबूब जंगलु, एस. के. दुबे, पीयूष कुमार (भुसावळ), ए. के. मिश्रा (मनमाड),अमित शर्मा, राजपाल सिंह (भुसावळ), एस. एन. खान (मनमाड), पी. एच. पाटील (भुसावळ), जे. के. शर्मा (खंडवा), व्ही. बी. शिंदे, एम. पी. नजाकर (भुसावल), एस. जे. श्रीवास्तव (खंडवा), शेख अल्ताफ, एस. एम. पुराणिक (भुसावळ), एस. एस. साव (खंडवा), आर. के. केसरी, मो. रफ़ीक लाडजी, मुन्ना कुमार श्रीवास्तव, ए.एम. खान, एस. पी. मालपुरे, पी. एम. पाटील, रमाशंकर प्रधान (भुसावळ) हीरालाल राम (खंडवा), मो. अबिदुल्ला, ए. के. गुप्ता (भुसावळ), रंजना संसारे (मनमाड), अरुण कुमार मिश्रा, शेख जावेद, अनिल खर्चे (भुसावळ), टी. बी. नुनसे (मनमाड), निसार खान, रंजित शर्मा, मंगेश पाठक (भुसावळ) यांचा समावेश आहे.



