नारीरत्न पुरस्काराच्या मानकरी- अँड.अश्विनी डोलारे ; ठेवीदारांच्या आंदोलनातून घडले खंबीर नेतृत्व :

भुसावळ (प्रतिनिधी )-
काही वर्षांपूर्वीचे ठेवीदारांचे आंदोलन, त्यांचे नेतु्त्व म्हटले की, आज ही आठवतेय ते अँड.अश्विनी प्रकाश डोलारे यांचा संघर्ष…. त्यांनी ठेवीदारांच्या ज्वलंत विषयावर प्रशासनच काय, तर सरकारलाही हलवून सोडले होते. त्यांनी ठेवीदारांची भक्कम बाजू मांडून शासनास काही ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक ठेवीदारांना दिलासा मिळाला. अशा आक्रमक बाण्याच्या अँड.अश्विनी डोलारे यांना राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था यांच्यातर्फे नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
अँड.डोलारे या गेल्या 6 वर्षांपासून वकिली व्यवसाय करीत आहेत. त्या आजही महिलांसाठी विनामूल्य कायद्याची लढाई लढताय. या अगोदर त्या सन 2007 ते 2014 दरम्यान उपवर मुलींच्या ठेवीदार संघटनेच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी ठेवीदारांसाठी
जवळपास साडेतीनशे आंदोलन केले. ठेवीदारांच्या प्रश्नी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. उपवर मुलींच्या लग्नासाठी क्रेडिट सोसायटीत अडकून राहिलेली रक्कम परत देण्यास भाग पाडले. अँड.डोलारे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाला उपवर मुलींसाठीचा विशेष G. R. काढायला भाग पाडले. या आंदोलनांमुळे आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 15 कोटी रुपयांची रक्कम बंद पडलेल्या क्रेडिट सोसायट्यांना उपवर मुलीच्या लग्नासाठी दिलेली आहे. अँड.डोलारे यांच्या या प्रभावी कार्याची दखल घेत त्यांना सन 2018 मध्ये खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी फाउंडेशनतर्फे उत्तम कामगिरीबाबत गौरविण्यात आले.
तसेच त्यांना सन 2019 मध्ये महिला दिनानिमित्त प्रेरणा पुरस्कारने गौरविण्यात आले होते. सन 2020 मध्ये RED. FM 91.1 तर्फे “डॅशिंग अँड प्रॉमिस पर्सनॅलिटी ऑफ दि इयर पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.
वकिली व्यवसाय महिलांना न्याय मिळवून देता यावा, म्हणूनच स्वीकारला. समाजात पुरुषांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याकामी सतत प्रयत्नशील होती व आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहिल, असेहा अँड.डोलारे आवर्जून सांगतात. या धडाडीच्या व्यक्तिमत्त्वास, त्यांच्या कणखर, लढवय्या वुत्तीस राजनंदिनी परिवार तर्फे मानाचा मुजरा देवूूून गौरव करण्यात आला.तसेेेच या पुरस्कारा या पुरस्कारा बद्दल सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *