भुसावळ नगरपरिषदेने सक्तीची कर वसुली थांबवावी ; नगरविकास मंत्र्याची माजी नगराध्यक्षांनी घेतली भेट ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नगर परिषदेच्या सक्तीच्या कर वसुली बाबत गुरूवार दिनांक २१ रोजी नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन कोविड-१९ मध्ये अनेकांच्या हाताला काम नसतांना अनेकांच्या रोजच्या दैनंदिन दोन वेळच्या जेवणाच्या अडचणी निर्माण झालेल्या आहे.तसेच अनेक लोक या कोरोनामुळे मरण पावलेले असतांना त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट असतांना त्यांना नगरपालिकेकडून मृत्यू दाखला, जन्म दाखला,विवाह नोंदणी अशा दाखल्याची आवश्यकता असतांना नगर परिषदेकडे जर दाखल्याची मागणी अर्ज केला तर नगरपरिषदेकडून मार्च 2021पर्यंत कर भरण्याची मागणी केली जात आहे.नगरपरिषदेकडून नागरिकांना मागील चार वर्षापासून कोणत्याही दैनंदिन सुविधा प्राप्त झालेल्या नसतांना रस्ते गटारी, हायमीस्ट दिवेे, शहराला १० ते १२ दिवसांनी मिळणाऱ्या पाण्याची असुविधा तसेच शहरात सर्वत्र झालेल्या कचऱ्यांचे ढीग त्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न या सर्व महत्त्वपूर्ण सत्यता माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मंत्री महोदयांच्या समोर मांडून नगरपालिका कोणतेही काम न करता सक्तीची कर वसुली करीत आहे.ही सक्तीची कर वसुली थांबवावी अशी मागणी
नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांना शहरवासीयांनी तर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे केली आहे . मंत्री महोदयांनी तात्काळ सक्तीची कर वसुली थांबवावी व याबाबत मुख्याधिकारी संदीप चित्रवाऱ यांना फोन करून
ही बाब गंभीर स्वरूपाची आहे3 आपण यावर तात्काळ आवर घालावा असा फोन केला व नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *