भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच शहरातील रस्ते तत्काळ दुरुस्त व्हावे या मागणी करीता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना माजी नगरसेवक शिवसेनेचे दिपक धांडे यांचेसह शहरवासीयांनी केली आहे . येत्या आठ दिवसांत मागणी मान्य न झाल्यास पालिकेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
भुसावळ शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे आणि त्यामुळे शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाण्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे आधीच कोरोनामुळे नागरिक हवालदिल झाले असतांना अशुद्ध पाणी
पुरवठ्यामुळे भुसावळ शहरातील नागरिकांना पोटाचे विकार सुरू झाले आहे
भुसावळ नगर पालिका सत्ताधारी जबाबदार
भुसावळ नगर पालिकेवर
भाजपाची ( नेवे पार्टी ) एक हाती सत्ता असून सुध्धा सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे भुसावळ शहरातील जनतेला याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. भुसावळ शहरासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये अमृत योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले , गाव भर मोठं मोठी बॅनर लावण्यात आली. लाखो रुपये अमृत योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला खर्च करण्यात आला परंतु आज ३ ते ४ वर्ष होऊन सुध्धा सत्ताधाऱ्यांना अमृत योजनेचे पाणी जनते पर्यंत पोहोचवता आले नाही.
भुसावळ शहरात ज्या ११ पाण्याच्या टाक्याचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले त्या पैकी एक ही पाण्याची टाकी सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आली नाहीं , तापी नदी पात्रामध्ये बंधाऱ्याचे काम यांच्या कडून झाले नाही
रस्त्यांची झाली चाळण भुसावळ शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठं मोठी खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे वाहन धारकांना गाडी चालवताना खूप कसरत करावी लागत आहे त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने अमृत योजनेच्या पाईप लाईन मुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखल झालेला आहे या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे बहुतांशी नागरिकांना मणक्याचे व मानेचे विकार सुरू झालेले आहे या संदर्भात शिवसेनेच्या वतीने या आधी सुद्धा भुसावळ नगर पालिकेला निवेदन देण्यात आलेली आहे परंतु निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना त्याचा काही एक फरक पडलेला नाही या सर्व बाबीचा विचार करून येत्या आठ दिवसांत भुसावळ शहरातील रस्त्यामधील खड्डे बुजवावे व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अन्यथा भुसावळ शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिक व जनतेला सोबत घेऊन भुसावळ नगर पालिकेची प्रतीकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढण्यात येईल



