भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे प्रशासनातर्फे शेतक-यांना त्यांचा माल रेल्वेने बुक करून पाठवण्यासाठी देवळाली-दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल रेल्वे गाड़ी दि.७ आॅगस्ट पासून वेळापत्रकानुसार दर शुक्रवारी चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे प्रसिध्दीस देण्यात आली आहे . या पार्सल गाडीत फळे,भाजीपाला आणि इतर नाशवंत माल बुक करू शकता येईल.सदर गाडी आठवड्यातून १ दिवस चालवली जाणार आहे .
गाडी क्रमांक ००१०७ डाऊन देवळाली ते दानापूर ही गाडी दर शुक्रवारी दि.७ आॅगस्ट ते २८ आॅगस्ट पर्यंत देवळाली स्थानकावरून ११ वाजता निघेल आणि शनिवारी दानापूरला ६-४५ वाजता पोहोचेल.
सदर गाडी नाशिक,मनमाड,जळगाव,भुसावळ, बऱ्हाणपूर,खंडवा, इटारसी,जबलपूर,सतना,कटनी , माणिकपूर,चिवकी,वाराणसी , पंडित दिन दयाळ उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकांवर थांबेल .
तर गाडी क्रमांक ००१०८ अप दानापूर ते देवळाली ही गाडी दर रविवारी दि.९ ते ३०आॅगस्ट पर्यंत दानापुर स्थानकावरून १२ वाजता निघेल आणि सोमवारी देवळालीला ७-४५ वाजता पोहोचेल.
सदर गाडी विभागातील बऱ्हाणपूर,भुसावळ,जळगाव, मनमाड,नासिक रोड येथे थांबे घेणार आहे.



