लॉकडाऊनचे निमित्त सांगून वीज ग्राहकांची लूट व मनमानी कारभार थांबवा – शिशिर जावळे यांची मागणी.


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे प्रत्यक्ष रिडींग घेतले गेले नसल्याने सरासरी वीज बिलाची मागील वर्षाची तुलना करून, शक्कल लढवून वीज ग्राहकांकडून सरासरी बिलाच्या माध्यमातून विज बिल आकारण्यात आले. मात्र आता लॉकडाऊन अन लॉक होताच वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. सरासरी बिल दिल्यानंतर जून महिन्यात अक्षरशः बिलाची चौपट आकारणी केली गेली. एक प्रकारे त्यांची फसवणूक असल्याचे स्पष्ट असल्याने महावितरणमध्ये युनिट मध्ये घोटाळा अफरातफर असल्याचे दिसत आहे. मार्च ,एप्रिल, मे, महिन्याचा दरमहा विजेचा भरणा केल्यानंतरही लॉकडाऊन ग्राह्य धरून जून महिन्यात विजेचे युनिट चौपट आकारणी करून वीज बिल ग्राहकांना दिले आहे. नियमित भरणा केल्यानंतरही जून महिन्याचा अव्वाच्या सव्वा बिल पाहून ग्राहकांना शॉक लागला आहे.लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आता एवढे मोठे बिल कसे भरावे असा सवाल उपस्थित झाला आहे.
जून महिन्याच्या बिलाची आकारणी करताना मागील वर्षी एप्रिल, मे, जून महिन्याची आणि यावर्षी याच महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे तसेच उन्हाळा असल्याने वीजेचा अधिक वापर झाल्याचे महावितरण चे म्हणने आहे. महावितरण कंपनी कडून सातत्याने ग्राहकांची पिळवणूक होत असल्याचं सर्वश्रुत असून आजपर्यंत आज पावेतो तक्रारींना केराची टोपली दाखवण्याचं काम महावितरण’ने केले आहे. कोरोना सदृश्य गंभीर परिस्थितीमुळे दिल्लीसारख्या राज्यांमध्ये सरासरी फक्त शंभर रुपये बिल आकारले जात आहे. माता महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरण’चा अनागोंदी कारभारामुळे सर्वच ग्राहक त्रस्त आहेत. जळगाव जिल्ह्यातील सरासरी बिलांच्या दर आकारणीबाबत संदर्भात गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व विज ग्राहकांचे बिलांच, तसेच जिल्ह्यातील महावितरणकडे येणाऱ्या सर्व तक्रारींच् सुद्धा स्पेशल ऑडिट करून चौकशी करण्याची मागणी प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रसार समिती जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, यांचेकडे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *