अखिल भारतीय सफाई कामगारांची बैठक संपन्न ; सफाई कामगारांच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर ; मुख्याधिकारी यांच्याकडे समस्या मांडणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे सफाई कामगार यांना सुरक्षीततेकरिता कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही सफाई कामगार असुरक्षित आहे.म्हणून त्यांना आपल्या सुरक्षतेसाठी कवच मिळण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून मागण्या करण्यासाठी येथील साफसफाई कर्मचाऱ्यांचे अडचणी सोडविण्यासाठी अखिल भारतीय सफाई कामगार भुसावळ शाखे तर्फे मुख्याधिकारी यांना भेटणार असल्या संदर्भात .
शुक्रवार ३ रोजी बैठक घेण्यात आली ,
बैठक खान्देश विभाग प्रमुख सुनील खोखरे, जिल्ह्यध्यक्ष संतोष धामदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली .बैठकीत सर्वानुमते सफाई कामगारांच्या सुरक्षेबद्दल चर्चा विनिमय करण्यात आला . सफाई कामगार यांच्या जिवाला सुद्धा धोका असून त्यांना सुरक्षा कवच मिळावे अशी एकमुखी मागणी व निर्णय यावेळी घेण्यात आला .तसेच विविध तक्रारी व मागण्या बाबत चर्चा करण्यात आली .
यावेळीअखिल भारतीय सफाई कामगार अनिल टाक,अजय ढिक्याव,सुनील लोट,मनोज डुलगज, कायदेशीर सल्लागार अँड.विजय तायडे,राजेंद्र वानखेडे,प्रवीण पंडित,पवन कुमार चंडाले, प्रदीप भालेराव ,सचिन टाक,जयप्रसाद लोट,सागर चंडाले आदी उपस्थित होते .प्रसंगी अखिल भारतीय संघटना यांच्या वतीने सर्वाना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *