भुसावळात दामिनी पथकाची टवाळखोरांवर नजर : शाळा परिसरात गस्त वाढवली

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच खासगी क्लासेसच्या परिसरात मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथकाकडून गस्त वाढवण्यात आली आहे. या परिसरात फिरणाऱ्या टवाळखोर तरुणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून आहे. दरम्यान, यासंदर्भात गणवेश सक्तीसाठी पोलीस प्रशासन देणार शाळांना पत्र देणार आहे.

शाळेच्या वेळेत गणवेशाऐवजी इतर कपड्यांमध्ये फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई करताना

अनेकदा संबंधित तरुण हा त्याच परिसरातील शाळेचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येताना अनिवार्यपणे गणवेश परिधान करावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्व शाळांना पत्र देऊन गणवेश सक्तीची सूचना करण्यात येणार आहे. सध्या शाळा व महाविद्यालय परिसरात दामिनी पथकाची नियमित गस्त सुरू असून, मुलींची छेडछाड किंवा त्यांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई सुरू आहे, तर मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे डीवायएसपी केदार बारबोले यांनी सांगितले.