भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजसह इतर कोर्सेस सुरू


भुसावळ ( प्रतिनिधी ) –
येथील आर्या फाऊंडेशन संचलितच्या वतीने भुसावळ येथील पांडूरंग टॉकीजच्या मागे श्री व्यंकटेश बालाजी मंदिरासमोर अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजसह योग व निसर्गोपचार, अल्ट्रासाऊंड सोनोग्राङ्गी या कोर्सेसह ङ्गायर ऍण्ड सेप्टी कॉलेज सुरू केले जात आहे. या कॉलेजसह कोर्सेसमध्ये प्रवेश घेणार्‍या युवक युवतींना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे.
अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजमध्ये बारावी विज्ञान परिक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन बॅचलर ऑफ़ रेडिएशन इमॅजीन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, सीटी स्कॅन टेक्निशियन, एमआरआय टेक्निशियन हे कोर्सेस करून रोजगाराची संधी उपलब्ध करून घेता येणार आहे. याच बरोबर नॅशनल अकॅडमी ऑफ़ फायर ऍण्ड सेप्टी कॉलेजमध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून ते फ़ायर इनचार्ज, फायर ऑफिसर, फायर सुपरवायझर, फायर मॅन व फायर इन्स्पेक्टर या पदांसाठी पात्र राहणार आहेत.
योग व निसर्गोपचार कोर्सेसमध्ये कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रवेश घेवू शकणार आहेत. यात ते प्राणायाम, आहार शास्त्र, ऍक्युप्रेशर, चुंबक चिकित्सा, शास्त्रोक्त मसाज थेरपी, मड थेरपी, लंघन शास्त्री, शरिर रचना शास्त्र, रोग निदान व चिकित्सा शिकू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रणव बळेल ७८७८३०६७६७ व सौ.सुवर्णा इंगळे ९३५९४६९६२० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आर्या फ़ाऊंडेशनच्या संचालिका डॉ.सौ.वंदना वाघचौरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *