भुसावळ (प्रतिनिधी )- जवळील चोरवड येथे रेल्वेच्या विद्युत इलेक्ट्रिक लोको शेडमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सेमिनार रविवार दि २५ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील असिस्टंट पर्सनल ऑफिसर समाधान हिवाळे आणि मुख्य कार्यालय अधीक्षक उमाकांत बावीस्कर प्रामुख्याने उपस्थित होते. सेमिनार दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध अडीअडचणी व समस्या मांडल्या. प्रमुख पाहुण्यांनी सर्व समस्या अत्यंत सकारात्मकतेने जाणून घेतल्या आणि त्यांच्या या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी केले होते. २००५ ते २०२६ पर्यंत सेवानिवृत्त झालेले रेल्वे कामगारांसह प्रल्हाद पवार,व्ही. टी.जगदेव,पी.ए.महाजन,एस.आर.चौधरी, व्ही.डी.सोनकुसरे,एच.आर.पाटणकर,प्रेमचंद कचवे,चंद्रकांत पाटील,किरण पाटील,सतीश कोल्हटकर,समाधान हिवाळे,नूर मोहम्मद,ए हसन,शिवाजी वाढे,सुरेश महाले,गोकुळ कोळी,विजय ब-हाटे,पांडुरंग इंगळे,देवीदास सोनार,एस.सी.इलामे यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललितकुमार मुथा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गोविंदा भोळे यांनी मानले फोटो कॅशन - भुसावळ येथे रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेमिनार प्रसंगी उपस्थित सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सोबत ललीतकुमार मुथा,प्रल्हाद पवार,व्ही.टी.जगदेव,पी.ए.महाजन,एस.आर.चौधरी,व्ही.डी.सोनकुसरे,एच.आर.पाटणकर,प्रेमचंद कचवे,चंद्रकांत पाटील,किरण पाटील,सतीश कोल्हटकर आदी.


