रेल्वेतर्फे पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांचे संचालन

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे द्वारा आगामी पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हडपसर ते मुजफ्फरपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कैंट दरम्यान अमृत भारत विशेष गाड्यांचे संचालन करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या प्रमुख विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

1) हडपसर ते मुजफ्फरपुर साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी (12 फेरी)
01481 साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २०.१०.२०२६ ते २४.११.२०२६ या कालावधीत प्रत्येक मंगळवार रोजी हडपसर येथून १९:५५ वाजता सुटेल आणि गुरुवार रोजी १२:०० वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल.
01482 साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २२.१०.२०२६ ते २६.११.२०२६ या कालावधीत प्रत्येक गुरुवार रोजी मुजफ्फरपुर येथून १३:१५ वाजता सुटेल आणि शनिवार रोजी ०२:४५ वाजता हडपसर येथे पोहचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, 
पंडित दिन द्याल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, आणि हाजीपूर. 
कोच संरचना: 11 सामान्य श्रेणी कोच, 8 स्लीपर श्रेणी कोच, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच.

2) हडपसर ते मुजफ्फरपुर साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी (12 फेरी)
01453 साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक १९.१०.२०२६ ते २३.११.२०२६ या कालावधीत प्रत्येक सोमवार रोजी हडपसर येथून १९:५५ वाजता सुटेल आणि बुधवार रोजी १२:०० वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल.
01454 साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २१.१०.२०२६ ते २५.११.२०२६ या कालावधीत प्रत्येक बुधवार रोजी मुजफ्फरपुर येथून १३:१५ वाजता सुटेल आणि शुक्रवार रोजी ०२:४५ वाजता हडपसर येथे पोहचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, 
पंडित दिन द्याल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, आणि हाजीपूर. 
कोच संरचना: 11 सामान्य श्रेणी कोच, 8 स्लीपर श्रेणी कोच, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच.

3) लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कैंट द्वि-साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी (24 फेरी)
01045 द्वि-साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक १९.१०.२०२६ ते २७.११.२०२६ या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:१५ वाजता अयोध्या कैंट येथे पोहचेल.
01046 द्वि-साप्ताहिक अमृत भारत विशेष गाड़ी दिनांक २०.१०.२०२६ ते २८.११.२०२६ या कालावधीत प्रत्येक मंगळवार आणि शनिवार रोजी अयोध्या कैंट येथून १३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.
थांबे: कल्याण, इगतपूरी,  नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़ आणि सुलतानपूर.
कोच संरचना: 11 सामान्य श्रेणी कोच, 8 स्लीपर श्रेणी कोच, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच.

आरक्षण -: विशेष गाडी क्रमांक 01481, 01453 आणि 01045 साठी आरक्षण दिनांक १८.१०.२०२६ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल.
प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.