भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे द्वारा प्रवाशांच्या सोयीसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त नागपूर येथे येणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिनांक १९ व २० ऑक्टोबर २०२६ रोजी निवडक गाड्यांना अजनी स्थानकावर एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. १) दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) – डाउन दिशेने धावणाऱ्या गाड्या या दिवशी खालील चार गाड्यांना अजनी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात येईल. * गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद–हावडा एक्सप्रेस * गाडी क्रमांक १२१५९ अमरावती–जबलपूर एक्सप्रेस * गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस * गाडी क्रमांक ११२०४ मडगाव–नागपूर एक्सप्रेस २) दिनांक २० ऑक्टोबर २०२६ (मंगळवार) – डाउन दिशेने धावणाऱ्या गाड्या या दिवशी खालील सहा गाड्यांना अजनी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात येईल. * गाडी क्रमांक १३४२६ सुरत–मालदा टाउन एक्सप्रेस * गाडी क्रमांक १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस–शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस * गाडी क्रमांक १२१२९ पुणे–हावडा आझाद हिंद एक्सप्रेस * गाडी क्रमांक १२८४४ अहमदाबाद–पुरी एक्सप्रेस * गाडी क्रमांक १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –हावडा मेल * गाडी क्रमांक २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनस–विशाखापट्टणम एक्सप्रेस ३) दिनांक २० ऑक्टोबर २०२६ (मंगळवार) – अप दिशेने धावणाऱ्या गाड्या या दिवशी खालील चार गाड्यांना अजनी स्थानकावर एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात येईल. * गाडी क्रमांक १२८१० हावडा–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेल * गाडी क्रमांक १२१३० हावडा–पुणे आझाद हिंद एक्सप्रेस * गाडी क्रमांक १२८३४ हावडा–अहमदाबाद एक्सप्रेस * गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाडीच्या आगमन व प्रस्थानाच्या वेळेची खात्री करून घ्यावी आणि रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कालावधीत प्रवाशांची ये-जा सुरळीत व सुव्यवस्थित राहण्यासाठी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीटासहच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


