भुसावळ (प्रतिनिधी) : “एकता हीच खरी शक्ती, समाजात आणूया नवी क्रांती!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली तिळवण तेली समाज भुसावळच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी इयत्ता १० वी, १२ वी, पदवी (डिग्री) व डिप्लोमा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता, से. रे. म. संघ (CRMS) कार्यालय, हंबर्डीकर चौक, हॉटेल ममता मागे, भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास समाजातील सर्व बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


