वरणगाव (वार्ता))- येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्व विभागीय जिल्हाध्यक्ष ॲड.धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटी तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी प्रा . मनोज देशमुख सर, यांनी स्व. राजीव गांधी यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती दिली. या प्रसंगी अशफाक काझी वरणगाव शहराध्यक्ष काँग्रेस, मनोज देशमुख सर जिल्हा सरचिटणीस, शैलेश बोदडे तालुकाध्यक्ष काँग्रेस, पंकज पाटील माजी तालुकाध्यक्ष, राजेश काकाणी विधानसभा क्षेत्र प्रमुख, अकील शहा तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, व शाळेतील मुख्याध्यापिका उषा समशेर तडवी, सौ. किरण ज्ञानदेव अहिर, राकेश कुलकर्णी ,गुणवंत पाटील, श्री मनोज चौधरी व इतर शिक्षक उपस्थित होते.


