प्रयागराज/सूबेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनस, विशेष गाड्या आता नियमित, अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावणार :

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांची सुविधा तसेच रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने विशेष गाड्यांचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रयागराज/सूबेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या दोन साप्ताहिक विशेष गाड्या आता नियमित अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावणार आहेत.

प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस

गाडी क्रमांक 04151/04152 प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज विशेष आता नियमित गाडी क्रमांक 20436/20435 प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) म्हणून चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 20436 प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस दि. 21 ऑगस्ट 2026 पासून प्रत्येक शुक्रवारी प्रयागराज येथून सायंकाळी 6.10 वाजता सुटेल व शनिवारी दुपारी 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 20435 लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस दि. 22 ऑगस्ट 2026 पासून प्रत्येक शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी 5.20 वाजता सुटेल व रविवारी दुपारी 12.40 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.

या गाडीला सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण येथे थांबे असतील.

सूबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस

गाडी क्रमांक 04115/04116 विशेष ही आता नियमित गाडी क्रमांक 14121/14122 सूबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस–सूबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) म्हणून धावणार आहे.

गाडी क्रमांक 14121 सूबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस दि. 27 ऑगस्ट 2026 पासून प्रत्येक गुरुवारी सूबेदारगंज येथून दुपारी 12.10 वाजता सुटेल व शुक्रवारी रात्री 8.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 14122 लोकमान्य टिळक टर्मिनस–सूबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस दि. 28 ऑगस्ट 2026 पासून प्रत्येक शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10.55 वाजता सुटेल व रविवारी सकाळी 7.30 वाजता सूबेदारगंज येथे पोहोचेल.

या गाडीला फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम कर्वी, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे येथे थांबे असतील.

आधुनिक सुविधांनी सज्ज कोच

दोन्ही अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची कोच संरचना 11 सामान्य श्रेणीचे कोच, 8 स्लीपर श्रेणीचे कोच, 1 पॅन्ट्री कार तसेच 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच अशी राहणार आहे.

अमृत भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच, आरामदायी आसनव्यवस्था आणि विविध आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध असल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne अॅपचा वापर करू शकतात. तसेच या गाड्यांच्या विविध स्थानकांवरील थांब्यांच्या सविस्तर वेळापत्रकाची माहिती NTES अॅप अथवा रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.