भालोद (वार्ता.)-भालोद महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागात सर्प संवर्धन जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ अजय कोल्हे यांनी केले. त्यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्प संवर्धन व त्याविषयी समाजात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र असून सर्प संवर्धन हे अन्नसाखळीमध्ये महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा डॉ किशोर कोल्हे, मराठी विभागप्रमुख प्रा डॉ जतीनकुमार मेढे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ वसंत पवार महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा चंद्रकांत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना जनजागृतीचे उपाय व व भारतातील प्रमुख विषारी साप आणि सर्पदंशाची आढळून आल्यास तत्कालीन प्रथमोपचार कसा करावा याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भारतात प्रामुख्याने धामण अजगर मांडूळ गवत्या हरणटोड आणि पाणसाप हे प्रमुख बिनविषारी साप आढळतात त्यांच्या चावण्याने माणसाचा मृत्यू होत नाही कारण त्यांच्यामध्ये विषारी ग्रंथी नसतात हे साप शेतातील उंदीर व किडे खाऊन शेतीचे रक्षण करतात त्याचप्रमाणे आढळणारे त्याचप्रमाणे भारतात आढळणारे किंग कोब्रा, इंडियन क्रेट रसेल वायपर, करवतीच्या खवल्यांचा विषारी साप, भारतीय नाग, मलबार पिट वायपर, पट्टेरी मण्यार, बांबू पिट वायपर इत्यादी विषारी सापांचे छायाचित्र दाखवून मार्गदर्शन केले नाग मण्यार घोणस फुरसे हे चार अत्यंत विषारी साप कसे ओळखावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले सापाबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रध्दा संपवणे आवश्यक आहे याचे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य किशोर कोल्हे यांनी सर्पच्या विषापासून सर्प दंशावर उपचार करणारे अँटीव्हिनेम लस तयार केली जाते याचे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांनी साप दिसल्यास न मारता स्थानिक सर्पमित्रांना फोन करून सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडावे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्प संवर्धन व त्याविषयीची जनजागृती समाजामध्ये करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मिनाक्षी वाघुळदे यांनी केले.


