नाहाटा महाविद्यालयात OJT/इंटर्नशिप विषयक एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ; महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना औद्योगिक समस्या व रोजगार संधींबाबत मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालय आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) व इंटर्नशिप विषयक एकदिवसीय कार्यशाळा बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेस प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक श्री. मनीष पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील होते, तर उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते श्री. मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना OJT आणि इंटर्नशिपचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच Innoversity या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून औद्योगिक समस्यांवर प्रत्यक्ष काम कसे करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अशा प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होऊन त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन : OJT/इंटर्नशिपविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक श्री. मनीष पाटील.